सीएसएमएसएस कृषि महाविद्यालयात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा


CSMSS Campus, Chhatrapati Sambhajinagar
21 Jun 2025
छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित कृषि महाविद्यालय कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर येथे ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचे विशाखापट्टणम येथील होणाऱ्या योग दिनानिमित्त संदेशाचे थेट प्रक्षेपण राजश्री शाहू महाराज सभागृहात आयोजन करण्यात आले, त्यानंतर छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयातील स्वस्त वृत्त एवं योगा विभागातील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगाचे प्रात्यक्षिके घेण्यात आली. या कार्यक्रमाकरिता सीएसएमएसएस चे प्रशासकीय अधिकारी डॉ.श्रीकांत देशमुख, कृषि महाविद्यालयाचे संचालक डॉ. जगदीश जहागीरदार, प्राचार्य डॉ. प्रवीण बैनाडे, उपप्राचार्य प्रा. अतुल भोंडवे, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Send Your Request To Us

Call Us On: +91-9922668199 Or Fill in Our Enquiry Form

Enquire now