Kharif Farmers meet 2025 Successfully organized at Bidkin and Porgaon


बिडकीन व पोरगाव
13 Aug 2025
ग्रामीण जागरूकता कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक संलग्नता कार्यक्रमांतर्गत छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था कृषी महाविद्यालय कांचनवाडी यांच्या वतिने बिडकीन व पोरगाव येथे दि. १३ ऑगस्ट २०२५ व १४ ऑगस्ट २०२५ रोजी खरीप शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास शेतकरी बांधवांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दि. १३ ऑगस्ट २०२५ रोजी बिडकीन येथे पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये डॉ एस बी पवार यांनी आले लागवडी विषयी विस्तृत माहिती दिली तसेच पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी श्री वसंतराव कातबने यांनी मोसंबी व आंतरपीक याबद्दल आपले अनुभव व्यक्त केले. दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी पोरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याकरिता प्रमुख मार्गदर्शक श्री डॉ. एम बी पाटील यांनी मोसंबी पिकाबद्दल तसेच विविध प्रगतशील बागायतदार व त्यांचे शेतीतील योगदान याबद्दल माहिती दिली, त्यानंतर श्री डॉ. के. टी. जाधव यांनी जिरायत शेती बद्दल माहिती दिली त्यामध्ये तूर लागवड याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी पैठण, श्री विकास पाटील यांनी शासनाच्या व पोखरा अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली व त्यांचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले. प्रश्न उत्तराच्या कालावधीमध्ये सर्व शेतकरी बंधूंना शेतीमधील अडचणी जाणून घेण्यात आल्या व त्याबद्दल सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या शेतकरी मेळाव्यासाठी संस्थेचे सचिव माननीय श्री पद्माकर मुळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे प्रशासकीय अधिकारी माननीय श्री डॉ. श्रीकांत देशमुख यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले व कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रवीण बैनाडे व उप- प्राचार्य प्रा. अतुल भोंडवे यांचे सहकार्य लाभले. ग्रामीण जागरूकता कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक संलग्नता कार्यक्रम समन्वयक डॉ. राजूसिंग डोंगरजाळ, कार्यक्रम अधिकारी व महाविद्यालयातील प्राध्यापक यांची उपस्थिती होती. शेतकरी मेळावा यशस्वी करण्यासाठी कृषी दुतांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सुशील सातपुते यांनी केले व आभार प्रदर्शन कृषीकन्या कु. सलोनी राऊत हिने केले. या कार्यक्रमानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
Send Your Request To Us

Call Us On: +91-9922668199 Or Fill in Our Enquiry Form

Enquire now