NSS Special Camp at Wahegaon, Tq. Paithan District. Chh. Sambhajinagar


Chhatrapati Sambhajinagar
6 Mar 2025
या विशेष शिबिरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, दंत महाविद्यालय कांचनवाडी व आयुर्वेद महाविद्यालय कांचनवाडी यांच्या सौजन्याने विशेष आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये क्षय रोगाची तपासणी करण्यात आली. तसेच मंदिराचा परिसर, रस्ते व ग्रामपंचायातीचा परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच स्वयंसेवकांनी बालविवाह व व्यसन मुक्ती या विषयावर पथनाट्य सादर केले. कृषि विषयक व्यख्यानांमध्ये मोसंबी फळबाग लागवड व व्यवस्थापन या विषयावर मा. श्री.वसंत कातबने प्रगतशील शेतकरी व माजी. कृषि अधिकारी, कृषि विभाग, तूर लागवड तंत्रज्ञान मा.श्री.रामेश्वर ठोंबरे कृषि सहायक, विभागीय कृषि विस्तार केंद्र, महाराष्ट्र शासनाच्या कृषि विषयक योजना मा.श्री. रवी शेळके, प्राध्यापक, कृषि महाविद्यालय, गांधेली. तसेच समाजप्रबोधनामध्ये मा.प्रा.श्री. दिपक नागरे यांनी हुंडाबळी व बालविवाह या बद्दल प्रबोधन केले. तसेच महिला दिना निम्मित्त प्राध्यापिका पुराणिक प्रणिता, कृषि महाविद्यालय यांनी महिलांना बचत गट व ग्रामीण भागातील महिलांचा आहार या विषयी माहिती दिली. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत कवी, प्राध्यापक डॉ. एस.बी. सातपुते, विजयकुमार पांचाळ, आर .पी.शिखरे, संदेश वाघमारे यांनी आपल्या प्रबोधनात्मक काव्यमैफिल मध्ये वेगवेगळ्या विषयावर कविता सादर केल्या.
Send Your Request To Us

Call Us On: +91-9922668199 Or Fill in Our Enquiry Form

Enquire now